आॕलिम्पिकचे पहिले सुवर्ण विजेते

  1. चीनची 21 वर्षीय नेमबाज यांग कियान- पहिलेच आॕलिम्पिक -आॕलिम्पिक विक्रम-

  2. 251.8 गुणांची कामगिरी. फक्त 0.7 गुणांनी रशियाच्या अॕनास्तेशिया गालाशिनावर मारली बाजी. स्वीत्झर्लंडची निना ख्रिस्तेन तिसरी आली.

  1. याच प्रकारात सहभागी भारताच्या दोन्ही नेमबाज, अपूर्वी चंदेला व एलावेनील वालारिव्हन या अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठर0 मी. एअर रायफलची महिलांची ही स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण होती कारण आधीच्या आॕलिम्पिकमधील एकही पदकविजेती यावेळच्या स्पर्धेत नव्हती. त्यामुळे नवा चेहरा आॕलिम्पिक विजेता ठरणार हे निश्चित होते.

  2. आधीच्या आॕलिम्पिकची एकही विजेती स्पर्धक यावेळी नव्हती. त्यामुळे यावेळी 10 मी. एअर रायफलमध्ये नवा चेहरा विजेता ठरेल हे निश्चित होते.

  3. यांगने अंतिम क्षणापर्यंत आपला संयम व आपली एकाग्रता कायम राखली. शेवटच्या नेमावेळी तिने 9.8 गूण कमावत रशियन स्पर्धकावर फक्त 0.7 गूणांच्या फरकाने सुवर्णपदकाची बाजी मारली. 

  4. विशेष म्हणजे पात्रता फेरीत यांग सहाव्या आणि गालाशिना आठव्या स्थानी होती आणि पात्रता फेरीची विजेती नाॕर्वेची जेनेट हेग होती. तिला मात्र चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.

  5. रियो आॕलिम्पिकमध्येही याच प्रकारात पहिली सुवर्णपदक विजेती ठरली होती. त्यावेळी अमेरिकेच्या व्हार्जिनिया थ्रॕशर या 19 वर्षांच्या खेळाडूने 10 मी. एअर रायफलचेच सूवर्णपदक जिंकले होते आणि चिनी स्पर्धक दुसऱ्या व तिसऱ्या आल्या होत्या.

व्हर्जिनीया थ्राॕशर

2012 च्या लंडन आॕलिम्पिकमध्येही 10 मीटर एअर रायफल महिलांचेच पहिले सुवर्णपदक ठरले. त्यावेळी चीनची 23 वर्षीय यी सिलिंग विजेती ठरली होती आणि पोलंडला रौप्य व चीनला कास्यपदक मिळाले होते.

यी सिलिंग

Write a comment ...

LalitMBA

Sports affecrionate, Nature lover, loves to roam freely, Simple soul