टोकियो ऑलिम्पिकमध्ये आहेत 12 ते 62 वर्षांचे स्पर्धक!

खेळाडूंचे वय आणि कारकिर्द पस्तीशीच्या आत असे म्हटले जाते आणि १२ आणि १३ वर्षात ऑलिम्पिक म्हणजे एवढ्या कमी वयात...अशी प्रतिक्रिया स्वाभाविक आहे पण टोकियो  ऑलिम्पिकमध्ये (Tokyo OIympic) या दोन्ही टोकांचे खेळाडू दिसणार आहेत. वयाची पस्तीशीच नाही तर पन्नाशी उलटलेले खेळाडू आपल्याला तिकडे पदकांसाठी स्पर्धा करताना दिसणार आहेत त्याचप्रमाणे ११ व १२ वर्षांचेही स्पर्धक अनुभवींना टक्कर देताना बघायला मिळणार आहे.

  1. ६२, ५७ आणि ४६

टोकियोत सर्वाधिक वयाचा खेळाडू असेल तब्बल ६२ वर्षांचा. अँड्रयु होय (Andrew Hoy)  हा तो ऑस्ट्रेलियन अश्वारोहक. आधीच तीन सुवर्णपदकं जिंकलेल्या या अश्वारोहकाचे हे आठवे ऑलिम्पिक असेल. अमेरिकेच्या संघात अश्वारोहण संघात ५७ वर्षीय फिलीप डटन (Philip Dutton)  हा ज्येष्ठ खेळाडू आहे. उझबेकीस्तानची ४६ वर्षांची दिग्गज जिम्नॅस्ट ओक्साना चुसोवितिना (Oksana Chusovitina)  हीसुद्धा आठवे ऑलिम्पिक खेळयेत आणि सर्वाधिक वयाची जिम्नॅस्ट म्हणून तिची इतिहासात नोंद होणार आहे. १९९२ पासून ओक्साना ऑलिम्पिकच्या स्पर्धा गाजवत आली आहे. 

त्यासोबतच अमेरिकेच्या जिम्नॅस्टीक संघात मायकेला स्कीनर (MyKayla Skinner) ही अवघ्या २४ वर्षे वयात त्यांच्या संघातील सर्वात ज्येष्ठ खेळाडू ठरली आहे. २००४ पासून अमेरिकन जिम्नॅस्टिक संघात तिच्याहून अधिक वयाची खेळाडू आलेली नाही. चार वेळची सुवर्णपदक विजेेती सिमोन बाईल्स ही तिच्यापेक्षा फक्त काही महिनेच लहान आहे. याच अमेरिकन संघात १५ वर्षांची केटी ग्राईम्स ही जलतरणपटूसुद्धा आहे. 

फिलीप डटन

५७ वर्षीय  िफलीप डटन हा २००८ नंतरचा सर्वाधिक वयाचा अमेरिकन ऑलिम्पिकपटू आहे. २००८ मध्ये जॉन डेन थ्रीने सर्वाधिक वयात अमेरिकेसाठी ऑलिम्पिकचा विक्रम आपल्या नावे केला होता. डटनचे हे सातवे  ऑलिम्पिक असेल आणि २०१६ चा तो कास्यपदक विजेता आहे. त्यावेळी पदक जिंकून तो अमेरिकेचा १९५२नंतरचा सर्वाधिक वयाचा ऑलिम्पिक पदकविजेता ठरला होता. 

डटन हा आता अमेरिकेसाठी खेळत असला तरी तो आहे मूृळचा ऑस्ट्रेलियन आणि ऑस्ट्रेलियासाठी त्याने १९९६ व २०००मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे आणि २००८ पासून तो अमेरिकेसाठी ऑलिम्पिक खेळतोय. 
ॲथलेटिक्समध्ये पाचव्यादा ऑलिम्पिकमध्ये ४४ वर्षीय अब्दी अब्दीरहेमान धावणार आहे. हा मुळचा सोमालियाचा धावपटू २००० पासून अमेरिकेचा नागरिक आहे. स्यू बर्ड ही चार वेळा ऑलिम्पिक खेळलेली बास्केटबॉलपटू आता ४० वर्षे वयात पुन्हा मैदानावर आहे. ती अमेरिकेची सर्वाधिक वयाची महिला बास्केटबॉलपटू आहे. पाचव्यांदा ऑलिम्पिक खेळणारी स्यू आणि तिची सहकारी डायना तोरासी ह्या दोघी पाचव्या ऑलिम्पिक सुवर्णपदकावर डोळा ठेवून होता. अमेरिकन संघाने ४९ सरळ विजय मिळवले आहेत. १९९२पासून ऑलिम्पिकमध्ये ते सामना हरलेले नाही. 

हेंद झझा

१५ वर्षांची केटी ग्राईम्स (Katie Grimes)  ही पाच वेळची सुवर्णपदक विजेतीे केटी लीडेकी नंतरची अमेरिकेची सर्वात कमी वयाची जलतरणपटू आहे. केटीचे वय लंडन ऑलिम्पिकवेळी १५ वर्षांचेच होते.  मात्र केटी ग्राईम्स हीच्यापेक्षाही कमी वयाच्या खेळाडू टोकियोत असतील. त्यापैकी एक असलेली सिरियाची टेबल टेनिसपटू हेंद झझा (Hend Zaza)  ही तर फक्त १२ वर्षांचीच आहे.

स्काय ब्राऊन को कोकोना हिराकी

जपानची स्केट बोर्डींगची खेळाडू कोकोना हिराकी हीसुध्दा फक्त १२ वर्षांचीच असेल आणि जन्माने जपानी पण ब्रिटनसाठी खेळणारी स्काय ब्राऊन हीसुद्धा फक्त १३वर्षांचीच आहे. 

Write a comment ...

LalitMBA

Sports affecrionate, Nature lover, loves to roam freely, Simple soul