मॕरिज, शादी आणि निकाह!

खेळांच्या दुनियेत आजचा दिवस चर्चेत राहिला तो दोन लग्नांमुळे....

  1. फ्रेंच टेनिसपटू गेल मोन्फिल्स आणि युक्रेनची टेनिसपटू एलिना स्वितालोना

  2. राजस्थान राॕयल्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबे आणि त्याची गर्लफ्रेंड अंजुम खान

    सांगायची आवश्यकता नाही दोन्ही लव्ह मॕरिज आणि दोन्ही समाजातील परंपरांना छेद देणारी. एलिना स्वितोलिना ही गोरी आणि गेल मोनफिल्स हा काळा. ती युक्रेनची, हा फ्रान्सचा..पण टेनिसच्या कोर्टवर लव्ह आॕलपासून सुरुवात करताना त्यांचे प्रेम बहरले. एप्रिलमध्ये एंगेजमेंट झाली आणि एलिनाच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या आयुष्यातील 'बेस्ट डे' ला 16 जुलै रोजी ही 'सुपर गर्ल' आणि 'ब्लॕक पँथर' जन्माजन्माचे साथीदार बनले.

    या दोघांच्या संस्कृतीत देश, वर्ण, जात पात याला फारसा थारा नाही म्हणून त्यांच्या एकत्र येण्याचे स्वागतच झाले. आणि आता हे नवपरिणित जोडपे टोकियो आॕलिम्पिकमध्ये आपल्या प्रेमाची जादू पसरवणार आहेत.

  3. या जोडप्याने अशाही आपल्या मजेशीर पोस्ट व व्हिडिओजनी आतापर्यंत कितीतरी चेहऱ्यांवर हसू फुलवले आहे. त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंटचे जे नाव आहे त्यावरुनही तुम्हाला कळेल की हे किती फनी व लव्हली जोडपे आहे. त्यांनी आपल्या अकाउंटचे नाव ठेवलेय GEMS Lifestyle (Gael Elina Monfils Svitolina). यंदा आॕस्ट्रेलियन ओपनवेळी कोरोनामुळे या दोघांना भेटता येणार नव्हते, वेगवेगळ्या हाॕटेलात आणि दूरदूरच रहावे लागणार होते त्यावेळचा एलिनाचा गेलच्या आठवणीतला फनी व्हिडिओ अजूनही आठवणीत आहे.

  4. https://twitter.com/ElinaSvitolina/status/1350175538984308742?s=19

  5. तर असे हे जोडपे टोकियोत खेळताना दिसेल...पण ती युक्रैनसाठी आणि तो फ्रान्ससाठी!

कुणी कुणाशी विवाह करावा ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे आणि त्याचे स्वातंत्र्यही आहे परंतु शिवम दुबे नावाचा माणूस अंजुम खान नावाच्या मुलीशी विवाहबध्द होत असेल तर काय प्रतिक्रिया येतील हे सांगायची गरज नाही.

अगदी तसेच झालेय. शिवम दुबे भयंकर ट्रोल होतोय कारण त्याने स्वतःच सोशल मीडियावर जारी केलेले त्याच्या विवाहाचे फोटो. यामध्ये मुंबईतील 16 जुलै रोजीचा हा विवाह समारंभ इस्लामी पध्दतीने पार पडल्याचे दिसतेय. त्यात शिवम दुआ करताना दिसतोय. त्यामुळे ही 'शादी होती की निकाह' असा सवाल लोकांनी केला आहे आणि फक्त निकाहच असेल, शादी नसेल तर हे कसले प्रेम...अशी टीकासुध्दा लोकांनी केली आहे.

आता शादी झालीय की नाही हे तर स्पष्ट झालेले नाही पण निकाहचेच जे काही फोटो आले आहेत ते झूम करुन काहींनी म्हटलेय की 'माथे पे बिंदिया, मांग मे सिंदूर' और क्या प्रुफ चाहिये की शादी दोनो रिवाजोंसे हुई है...काहींनी शिवम दुबेला शिवम खानही म्हटले आहे तर काहींनी या दोघांच्या धर्मनिरपेक्षतेचे कौतूक करत त्यांना शुभेच्छा ही दिल्या आहेत.

Write a comment ...

LalitMBA

Sports affecrionate, Nature lover, loves to roam freely, Simple soul