चांगली बातमी! टोकियो आॕलिम्पिकमध्ये आपण 17 पदके जिंकणार?

आॕलिम्पिक (Olympic 2021) आठवड्यावर आलेले असताना भारतासाठी एक अतिशय चांगली व उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे.

टोकियो (Tokyo) आॕलिम्पिकमध्ये भारताला 🇮🇳 आतापर्यंतचे सर्वाधिक यश मिळेल असा दावा करण्यात आला आहे. 'ग्रेसनोट' (Gracenote) या जागतिक पातळीवरील स्पोर्टस् डेटा कंपनीने (Sports Data Company) केलेल्या सर्वेक्षणानुसार टोकियोतून भारतीय खेळाडू चार सुवर्णपदकांसह एकूण 17 पदके जिंकून मायदेशी परततील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे आणि तसे झाले तर आॕलिम्पिकमध्ये भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश असेल. याच्याआधी लंडन आॕलिम्पिक 2012 मध्ये आपण सर्वाधिक सहा पदके जिंकली आहेत.

ग्रेसनोट'ने आॕलिम्पिक, विश्वचषक आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धा यांच्यातील कामगिरीचे विश्लेषण करून हा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यांच्या अंदाजानुसार 🇮🇳 भारताला

🏅 नेमबाजीत (Shooting) 8,

🏅 बॉक्सिंगमध्ये (Boxing) 4,

🏅 कुस्तीत (Wrestling) 3,

🏅 तिरंदाजी (Archery) 1,

🏅 वेटलिफ्टिंग (Weightlifting) 1

पदकाची संधी आहे.

ग्रेसनोट'च्या विश्लेषणानुसार भारताला

🥇 चार (4) सुवर्ण,

🥇 पाच (5) रौप्य आणि

🥇 आठ (8) कांस्यपदके

मिळू शकतात.

2016 मध्ये आपण फक्त एक रौप्य आणि एक कास्यपदक जिंकू शकलो होतो. या गणितानुसार भारत पदक तालिकेत 19 व्या स्थानी असेल असे ग्रेसनोट'ने म्हटले आहे.

याच संस्थेने 2019 मध्ये सर्वेक्षण केले होते तेंव्हा भारताला एकच सुवर्णपदकासह 14 पदके मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. त्यात 5 रौप्य व 8 कास्यपदकांचाही समावेश होता. पण आता त्यात तब्बल तीन सुवर्णपदकांची वाढ आता व्यक्त केली आहे.

🇮🇳🥇🥈🥉🇮🇳🥇🥈🥉🇮🇳🥇🥈🥉

ग्रेसनोटच्या अभ्यासानुसार आपल्याला मिळू शकणारी पदके अशी...
खेळ ------- सुवर्ण -- रौप्य -- कांस्य
नेमबाजी----- 2 ------- 3 ------ 3
बॉक्सिंग----- 0 -------- 1 ----- 3
कुस्ती------- 2 -------- 0 ------ 1
वेटलिफ्टिंग---0 -------- 1 ------ 0
तीरंदाजी ---- 0 -------- 0 ------ 1
एकूण -------4 ---------5 ------ 8

🇮🇳🥇🥈🥉🇮🇳🥇🥈🥉🇮🇳🥇🥈🥉

'ग्रेसनोट'ने व्यक्त केलेला हा अंदाज अविश्वसनीय वाटत असला तरी अवास्तव नाही कारण कुस्तीत बजरंग पुनिया व विनेश फोगाट यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहेच. तिरंदाजीत नंबर वन असलेल्या दीपिका कुमारीकडूनही यशाची आशा आहे. ती वैयक्तिक गटात किंवा मिश्र गटात आपले पती अतानू दास यांच्यासह पदकाची दावेदार आहे.

अॕथलेटिक्समध्ये नीरज चोप्रा हा भालाफेकीत आणि बॕडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हेसुध्दा पदकाचे दावेदार आहेत. 'ग्रेसनोट'ने त्यांचा मात्र उल्लेख केलेला नाही. दुसरीकडे 'ग्रेसनोट'ने बॉक्सिंगमध्ये जो चार,पदकांचा दावा केला आहे त्याबद्दल मात्र तेवढी खात्री वाटत नाही कारण भारतीय बॉक्सर्सची कामगिरी चांगली असली तरी त्यात सातत्य नाही.बॉक्सिंगमध्ये मेरी कोम व अमीत पंघाल यांच्याकडून पदकाची अपेक्षा बाळगता येईल. नेमबाजीत सौरभ चौधरी व मनू भाकर याच्याबद्दल बहुतेकांना आशा आहे. वेटलिफ्टिंगमध्ये आपली एकमेव स्पर्धक मिराबाई चानू हीसुध्दा पदकाच्या दावेदारांमध्ये आहे.

'ग्रेसनोट'च्या या जागतिक सर्वेक्षणानुसार सलग सातव्या आॕलिम्पिकमध्ये 🇺🇸 अमेरिका सर्वाधिक पदके जिंकेल. 43 सुवर्ण 30 रौप्य आणि 41 कास्य अशा 114 पदकांचा अंदाज त्यांनी अमेरिकेसाठी केला आहे मात्र रियोपेक्षा अमेरिकेची पदकांची संख्या 7 ने घटणार आहे.

या अंदाजानुसार 🇨🇳 चीन 38 सुवर्णपदकांसह 85 पदके घेऊन दुसऱ्या स्थानी राहिल. चीनच्या कामगिरीत रियोच्या तुलनेतलक्षणीय सुधारणा असेल. रियोत त्यांना 70 पदके मिळाली होती.

यजमान 🇯🇵 जपानच्या यशातही भरघोस वाढ होण्याचा अंदाज असून त्यांना 34 सुवर्ण 16 रौप्य व 9 कास्यपदकांचा अंदाज करण्यात आला आहे. 🇳🇱 नेदरलँडच्या यशातही लक्षणीय वाढ होण्याचा दावा करण्यात आला आहे.

Write a comment ...

LalitMBA

Sports affecrionate, Nature lover, loves to roam freely, Simple soul