1 लाख 99 हजार 854

1 लाख 99 हजार 854..

हा मथळा वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल हे काय आहे? ही कुठली व कशाशी संबंधीत संख्या आहे?

तर आजच्या दिवशी म्हणजे 17 जुलै रोजी 199, 854 या संख्येचे फार वेगळे महत्त्व आहे कारण 71 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 17 जुलै 1950 रोजी रियोतील मराकाना स्टेडियम येथे विश्वचषक फूटबॉलचा ब्राझिल वि. उरुग्वे हा सामना झाला होता आणि त्या सामन्याला मराकाना स्टेडियमवर प्रेक्षक होते...

1,99,854

कुठल्याही फूटबॉल सामन्याला लाभलेली ही विक्रमी प्रेक्षक संख्या. 71 वर्षानंतरही हा विक्रम टिकून आहे.

आणि एवढ्या भरगच्च स्टेडियममध्ये आपल्या प्रेक्षकांसमोर ब्राझिलचा संघ जिंकला होता की हरला होता...तर हारला होता आणि त्यांच्या पराभवाचे कारण ठरला होता हा गोल...

उरग्वेला सामना जिंकून देणारा हा गोल केला होता ...घिगिया याने...

योगायोग पहा...ह्या घिगियाने शेवटचा श्वास घेतला ती तारीखही होती 17 जुलै...वर्ष 2015. या सामन्यात खेळलेल्या खेळाडूंपैकी तो 2015 पर्यंत जगलेला शेवटचा खेळाडू होता.

या सामन्याबद्दल 'घिगिया' नेहमीच म्हणायचे..."मराकानाला शांत ठेवणारे फक्त तीनच लोक होते...फ्रँक सिनात्रा, पोप आणि मी!

यानंतर ब्राझिलियन गोलरक्षक बार्बोसा याला आयुष्यभर शिव्याच खाव्या लागल्या हा आणखी एक इतिहास.

Write a comment ...

LalitMBA

Sports affecrionate, Nature lover, loves to roam freely, Simple soul